संजू सॅमसनने शतक झळकावून इतिहास रचला; थेट धोनीच्या रांगेत जाऊन बसला…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने फलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. संजूने या सामन्यात झंझावाती शतक झळकावले आहे. शतक झळकावल्यानंतर त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविडच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा संजू हा केरळ राज्यातील पहिला खेळाडू ठरला आहे.

संजूने तुफानी इनिंग खेळली

संजू सॅमसनने डावाच्या सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी सुरू ठेवली. त्याने मैदानभर फटके मारले. त्याला टिळक वर्मा यांनी चांगली साथ दिली. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील पहिले शतक आहे. त्याने 110 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने 114 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 108 धावा केल्या. वनडेत शतक झळकावणारा संजू भारताचा पाचवा यष्टिरक्षक ठरला आहे. तो महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविडच्या यादीत सामील झाला आहे.

भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा विकेटकीपर फलंदाज:

महेंद्रसिंग धोनी – 9 शतके

राहुल द्रविड – 4 शतके

केएल राहुल – 2 शतके

ऋषभ पंत-१ शतक

संजू सॅमसन-1 शतक

संजू सॅमसनने २०२१ मध्ये भारताकडून पदार्पण केले. खराब फॉर्ममुळे तो संघात आणि संघाबाहेर राहिला आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. त्याने भारतासाठी 16 सामन्यात 502 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.