शिंदे गटातील दिग्ग्ज आमदाराला हार्टअटॅक, उपचारासाठी मुंबईला हलवलं

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिंटे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला (Mumbai) रवाना करण्यात आले आहे.

काल सायंकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यानं औरंगाबाद शहरातील सिग्मा रुग्णालयातदाखल करण्यात आले होते.त्यानंतर आज सकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट मुंबईला रवाना करण्यात आल आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवसेनेचे उमेदवार म्हणून शिरसाट सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाट देखील सामील होते. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल अंदाज बांधला जात होता. मात्र त्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.