महाजनांना जागा दाखवण्यासाठीच शिवसेनेचा उमेदवार !

संजय राऊतांची गिरीश महाजनांवर टीका

0

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत, त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी, असे आव्हान उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी गिरीश महाजनांना दिले आहे.

भाजप नेहमी तोडफोडीचे राजकारण करीत असून स्वहितासाठी गिरीश महाजन काही लोकांना दूर सारत आहेत; उन्मेष पाटील यांच्यावर अन्याय झाला असून तो अन्याय आम्ही दूर करु असेही संजय राऊत म्हणाले. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षफुटीनंतर या लोकसभा मतदारसंघातील तीन आमदार हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. मात्र, हे शिवसेना धनुष्यबाणावरती निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे या मतदार संघांमध्ये शिवसेनेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एकंदरीत बघता जळगाव लोकसभाची जागा शिवसेना ठाकरे गटाला निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यात चाळीसगाव मतदार संघातील उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने अधिकच शिवसेनेला ही जागा लढवण्यासाठी बळ मिळाले आहे.

जळगावात भाजपला जड जाणार ?

भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाला ही निवडणूक जड जाणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात 1991 नंतर पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे या गटाला ही जागा मिळाली आहे. त्यामुळे या जळगाव लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने विशेष लक्ष ठेवले असल्याचे दिसून येत आहे. कारण याआधी भाजप आणि शिवसेना ही जळगाव लोकसभा जागा एकत्रितपणे लढत होते. त्यामुळे शिवसेनेला ही जागा लढवता आली नाही, म्हणून भाजपाचा या ठिकाणी जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवार हा निवडून येत असतो. पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाला ही जागा त्यांच्या वाट्याला आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.