संजय राऊतांना कोर्टाचं समन्स, 6 ऑगस्टला राहावं लागेल हजर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या अडचणीत आले असून त्यांना किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या प्रकरणात कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यामुळे आता राऊतांना 6 ऑगस्टला शिवडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे. मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांवर अब्रू नुकसानीचा दावा केला असून या प्रकरणात त्यांना यापूर्वी कोर्टाने अटक वॉरंट जारी केला होता.

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यानंतर त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात याआधीही दोन वेळा अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. संजय राऊतांनी कुठलाही पुरावा नसताना मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते त्यामुळे मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.