काळजाला भिडणारी बातमी : साहेब आम्हाला आई- वडील दोघं पाहिजे

0

वाकोद ता जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

संसाराचा गाडा चालवितांना पती-पत्नी म्हणजे गाड्याची दोघं चाके मजबूत असले तेव्हाच तो योग्य मार्गाने मार्गक्रमण करीत असतो. गाड्याचे एक चाक जरी डगमगले तर संसाररूपी गाडा आहे त्याच जागी थांबतो. यातून चिमुकल्याचे न दिसणारे नुकसान होत असते आणि त्यांच्या बालमनावर वाईट परिणाम (Bad effects on children) होण्याचे जीवनात अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र वेळीच याला आळा घातला गेला तर संसाररूपी गाडा अनेक संकटाना तोंड देवून पुढे जातो. यांचे ताजे उदाहरण पहूर पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळाले.

चिमुकल्याना आपले आई- वडील अलग-अलग राहिलेले आवडत नाही.या चिमुकल्याच्या हाकेमुळे खाकी वर्दीतील माणूस पुढे येवून त्यांने विभक्त असलेल्या आई-वडीलांचे पुन्हा मनोमिलन घडवून आणले.या मनोमिलनामुळे आपण जीवनात काहीतरी पुण्यकर्म केल्याचे पोलीस खात्यास वाटू लागले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली असता चिमुकल्याच्या हाकेमुळे मने हेलावून टाकणारी घटना समोर आली.फत्तेपूर गांवापासून जवळच हिंगणे-पिंप्री एक छोटेसे खेडे आहे. येथील राजपूत समाजाचे योगेश पाटील या व्यक्तीचा विवाह तालुक्यातील वसंत नगर येथील कल्पना नांवाच्या तरूणीशी झाला.

संसाररुपी वेला वर दोन फुले ही खुलली.सर्व काही व्यवस्थित असतांना आनंदरूपी संसारात वादाची ठिणगी पडली. आणि मोठा मुलगा(१२) व मुलगी (९) वर्षाची असतांना आई-वडील वेग- -वेगळी झाली. दोघं मुले वडीलांकडे होते. मुलांना आईची कमीपणा जाणवत असला तरी त्यांना मने मारून जगावे लागत होते.

या चिमुकल्याना गेल्या नऊ/दहा महिन्यापासून आईचा कमीपणा जाणवत होता.अशातच एक आशेचा किरण उजाळला.या दोघांचा वाद फत्तेपूर पोलीस दूर क्षेत्रांमध्ये एका तक्रारी अर्जाच्या रुपाने आला.या ठिकाणी दोघं दापत्यांना बोलाविले . येथील पोहेकॉ किरण शिंपी,प्रवीण चौधरी,पोलीस नाईक दिनेश मारवाडकर, पोकॉ-राहुल जोहरे, यांनी दोघं पती-पत्नीमध्ये असणारा वाद मिटविणे कामी प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यांना यश मिळाले. मात्र हे प्रकरण वरीष्ठांकडे पाठविले तर यातून मार्ग निघु शकतो.असा आशेचा किरण पोलीसांना दिसला. म्हणून हे प्रकरण पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्याकडे गेले. त्यांनी आई- सौ. कल्पना, वडील-योगेश, बारा वर्षाचा मुलगा- अनिकेत व नऊ वर्षाची मुलगी-रक्षा, योगेशची आई व बहीन अशा लोकांना पहूर पोलीस स्टेशनला बोलाविले. आणि प्रत्येकांच्या मनात काय आहे हे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी जाणून घेतले.

त्यानंतर मुलांना बोलावून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. असता दोघंही मुलांनी मनाला टोचेल असे सांगितले की, आम्हाला आई-आणि वडील दोघं ही पाहीजे.हे ऐकून उपस्थितांचे मने हेलावून टाकली.यांचे सर्वाना नवल वाटले.

मुलांचे वाक्य ऐकून साहेबानी चिमुकली रक्षा हिला तुझे काय म्हणणे आहे. त्यावर ती छोटी चिमुकली म्हणाली सर आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवस असूनही माझे आई वडील अलग अलग आहेत. मला ते दोघंही हवे आहेत.त्यासाठी साहेब तुम्ही त्यांना समजवा तुमचे ते ऐकतील. या चिमुकलीच्या बोल साहेबाच्या काळजाला भिडले.त्यानंतर साहेबानी कोणाला काही एक न सांगता प्रथम वाढदिवस साजरा करणेसाठी पोलीस स्टेशनलाच केक मागविला व रक्षाचा वाढदिवस पोलीस स्टेशनला साजरा केला

Leave A Reply

Your email address will not be published.