इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, १० बेपत्ता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 10 वाजता हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक होते.

महाराष्ट्र महामंडळाची ही बस सकाळी 7.30 च्या सुमारास इंदूूरहून अमळनेरकडे निघाली होती. त्यावेळी बसमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून 25 फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे शिवराज सरकारमधील कॅबिनेट मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले आहे.

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असून बस क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृती बाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. तसेच रुग्णांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव आणि जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन आणि धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या बसमधील 10 ते 12 प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ  बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. जळगाव, धुळे येथून अधिकारी पोहोचल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले असून, मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आलेले आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले असून, मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आलेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहे की ही दुर्घटना अत्यंत दुःखद असून मृतांच्या कुटुंबासमवेत आमच्या संवेदना आहेत. बचाव कार्य आणि जखीच्या उपचारार्थ राज्य सरकार आणि एस ती महामंडळचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाच्या संपर्कात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.