मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
यंदा पावसाने लेट का होईना मात्र थेट हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाच्या या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सद्य परिस्थितीत सतर्कतेचा इशारा देऊन कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जाहीर केलाय. गडचिरोली, गोंदिया येथे रेड अलर्ट दिला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही दिला आहे. कोकणात देखील पावसाचे थैमान अद्याप कायम असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.