ED Raid in Mumbai; संजय राऊत यांचे निकटवर्गीय सुजित पाटकरांच्या मालमत्तेवर छापे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईत ईडी कडून छापेमारी सुरूच आहे. तब्बल १५ हुन जास्त ठिकाणी ईडीचे छापे मारीचे काम सुरूच आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्गीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याशी संबंधित तब्बल १० ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या (Lifeline Company) घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यानंच सुजीत पाटकर यांनी लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचं कंत्राट मिळवलं. तसेच यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवरही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त इक्बाल चहल यांचीही यापूर्वी या प्रकरणासंदर्भात ईडीनं चौकशी केली होती.

मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी सुरू आहे. कोविड काळातील कंत्राटांप्रकरणी इडी चौकशी करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.