पारोळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) वतीने असंविधानिक सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गद्दार दिवस आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटून गद्दारांचे सरकार स्थापन झालं व त्याला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून आजचा दिवस सम्पूर्ण महाराष्ट्रात हा गद्दार दिवस म्हणून साजरा करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरविल्याचे तालुका अध्यक्ष संतोष महाजन यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रदेश उपाध्यक्ष व माजी पालकमंत्री डॉ सतिश पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

शिंदे गटाने महाराष्ट्राशी गद्दारी करून बेकायदेशीर रित्या सरकार स्थापन केले त्याला एक वर्ष पूर्ण होत असून या दिवसाला महाराष्ट्रभर गद्दार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे आव्हान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्या अनुषंगाने पारोळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले खोक्यांचे राजकारण करून धोक्याने सत्ता बळकवलेल्या गद्दारांना महाराष्ट्र त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही व महाराष्ट्रातून त्यांची सत्ता हद्दपार व्हायची वेळ आलेली आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गद्दार दिवस व या गद्दारांच्या विरोधात निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमला पाहिजे अशा प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात गाव खेड्यात होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष संतोष महाजन यांनी दिली

माजी पालकमंत्री डॉ सतिश पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून कजगाव नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व छत्रपती शिवरायांच्या स्मारकापर्यंत सदर आंदोलनात प्रतिकात्मक खोके दाखवून व घोषणा देत गद्दार दिवस आंदोलन करण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.