उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात योग दिन साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

आज दिनांक 21 जून बुधवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र जळगाव आणि विश्व मंगल योग व निसर्गोपचार केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानातून रिंग रोड वरील उडान प्रशिक्षण केंद्रात दिव्यांग मुलं व महिलांसाठी योग प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले, उडान अध्यक्षा हर्षाली चौधरी योग प्राध्यापिका चित्रा महाजन व सह शिक्षिका मृदुला चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे सहकारी, महेंद्र पाटील जयश्री पटेल चेतन इंगळे प्रतिभा पाटील परिश्रम घेतले महिला पुरुष व मुलं सर्वांनी दररोजच्या दैनंदिन जीवनात योगा करून जीवन आरोग्यमय व सुंदर बनवूया अशी सर्वांनी शपथ घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.