धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग

0

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क

नंदुरबारच्या कोंडाईबारा घाटत परत एकदा चालत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. मागच्या महिन्यापपासून ते आत्तापर्यंत चार वेळा असा प्रकार घडून गेला आहे. नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर (Dhule-Surat National Highway) कोंडाईबारी घाटात चालत्या ट्रकमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हि आग शॉर्टसर्किटमुळे ट्रकच्या चाकाला लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी कोंडाईबारी घाटातील (Kondaibari Ghat) निमदर्डा फाट्यानजीक महामार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग लागली होती. या घटनेतही ट्रकच्या केबिनमध्ये आगीचा भडका उडाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली होती.

आजच्याही घटनेत ट्रकने क्षणार्धात पेट घेतल्याने चालकाला पळता भुई थोडी झाली. त्याने उडी मारून जीव वाचविला. मात्र ट्रकचा कोळसा झाल्याने मोठे नुकसान झाले. हा ट्रक गुजरात राज्यातील वाकाचार रस्ता येथून वाळु (रेती) भरून नाशिकच्या (Nashik) दिशेने जात असताना अचानक आग लागली. मालट्रकचे केबिन लाकडी असल्याने क्षणार्धात संपूर्ण केबिन जळू लागले. विसरवाडी ते कोंडाईबारी घाट या परिसरात महिन्याभरात चौथ्यांदा अग्नि उपद्रवाची घटना घडली असून यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी होत नसली तरी वाहनाचे व वाहनातील साहित्य आगीत जळून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.