भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने प.महाराष्ट्र अध्यक्ष तथा लोणावळा नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट मध्ये आयोजित केलेल्या रिपाई चा द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला त्यात भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर आण्णा यांना सन्मान पत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला रिपाई चे राज्य सरचिटणीस गौतम दादा सोनवणे, प. महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब, नगर जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या सह प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
तालुक्यात विविध आंदोलने. मोर्चा, रास्ता रोको, जनहिताची उपोषणे, या सह विविध मागण्यांचे निवेदन देऊन गाव तिथ शाखा उपक्रम राबवून गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न या कार्याची थेट दखल घेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, प. महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष राजू सुर्यवंशी, जळगाव लोकसभा जिल्हा प्रमुख आनंद खरात, युवा जिल्हा अध्यक्ष भगवान सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्र परिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.