“.. तर मालमत्ता मी भाजपला दान करेन”; संजय राऊतांचे भाजपला थेट आव्हान

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केलीय. ईडीने अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. एक रुपया जरी गैरव्यवहारात सापडला तर ही मालमत्ता मी भाजपला दान करेन, असे थेट आव्हान राऊत यांनी दिलेय. तसेच ते म्हणाले की, आमचं राहतं घर जप्त केले आहे. त्यावर भाजपचे लोक उड्या मारत आहेत. फटाके वाजवत आहेत. मराठी माणसाचे हक्काचे राहते घर जप्त केल्याबद्दल. आनंद आहे. असेच करत राहिले पाहिजे. यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते. असत्यमेव जयते !!, असे ट्विट त्यांनी केले आहे.

हे लोक आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत. आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. अशा कारवाया केल्या म्हणून हा संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपच्या लोकांनी महाराष्ट्रातले सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावे लागेल,  असे राऊत जप्तीनंतर माहिती देताना म्हटले.

दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांनी संयुक्तपणे अलिबाग येथील किहीम समुद्रकिनारी असणारा भूखंड ईडीने जप्त केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.