जनकल्याण फाउंडेशनतर्फे सेवा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जनकल्याण फाउंडेशनतर्फे रावेर येथे सेवा रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यात समाजसेवा, राजकीय, शैक्षणिक, कृषी, अंगणवाडी सेविक, आशा स्वयंसेविका, पर्यावरण, क्रीडा, आरोग्य, कला, सांस्कृतिक, ग्रामसेवा, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, शेतकरी, युवा शेतकरी, युवा उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील उत्कृष्ट उल्लेखनीय काम करणाऱ्या 123 महिला व पुरुष यांना जनकल्याण फाउंडेशन अंतर्गत सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रावेर येथील सौ. कमलाबाई गर्ल्स हायस्कूल येथे करण्यात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत मोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रावेर पोलीस स्टेशनचे पो.नी. कैलास नागरे, शैक्षणिक सवधक संघ चेअरमन प्रकाश मुजुमदार, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र महासचिव रविंद्र सूर्यवंशी, ह्यूमन राइट्स संघ उ. महा. अध्यक्ष दिपक पाटील, जनकल्याण फाउंडेशन उ. महा. संघटक रेखा जैन, पोलीस मित्र उ. महा. महिला महासचिव पुष्पा पाटील, ग्राहक संरक्षण संघ उ. महा. अध्यक्ष अमेय कुळकर्णी, शेतकरी संघटना उ. महा. उपाध्यक्ष सुनील वाघ, पोलिस मित्र संघटना महिला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष निरंजना तायडे, जनकल्याण फाउंडेशन जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्ष सुनिता सपकाळ, पोलिस मित्र संघटना जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र चौधरी, माहिती अधिकार उ. महा. उपअध्यक्ष मनोज वाघ, जनकल्याण फाउंडेशन पदाधिकारी रितेश सोनवणे, सुमित वाघ, सौरभ वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता डेरकेर तर आभार वर्षा पाटील यांनी मानले. कार्यक्रमास समाजसेवक, राजकीय, आरोग्य, कृषी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पर्यावरण, क्रीडा, आरोग्य, कला-संस्कृती, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य शेतकरी युवा शेतकरी युवा उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील कार्य करणारे कोरोना योद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनकल्याण फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र संघटना रावेर तालुका महिला अध्यक्ष वर्षा पाटील, उपाध्यक्ष मनीषा गायकवाड, रावेर तालुका उपाध्यक्ष योगिता वानखेडे, रावेर तालुका उपाध्यक्ष सुनिता डेरकेर, रावेर तालुका सचिव शारदा चौधरी, रावेर तालुका संघटक पल्लवी घोरपडे, रावेर तालुका संघटक दिनेश महाजन, रावेर तालुका संघटक विजय गायकवाड, रावेर तालुका उपसचिव नाना महाजन यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.