चाळीसगावमध्ये गुटख्याने भरलेला कंटेनर जप्त

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

ग्रामीण पोलीसांनी चाळीसगावमध्ये आज मोठी कारवाई करून गुटख्याचा कंटेनर पकडला. यात सुमारे एक कोटीचा मुद्देमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आज चाळीसगावमध्ये ग्रामीण पोलीसांनी एका कंटेनवर संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पकडला. या कंटेनरची अधिक तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा भरलेला असल्याचे दिसून आले. पकडलेल्या गाडीचा नंबर क्र. एच.आर. ३८ एबी ६०९६ असा आहे.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.