हिंमत असल्यास स्वतःचा पक्ष स्थापन करा ; संजय राऊत यांचे शिंदे ,अजित पवार यांना आव्हान

0

मुंबई ;- तुमच्यात जर हिम्मत असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करावा. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून लोकांसमोर जाऊन मत मागावी. त्यानंतर आपण अंगार कोण आणि भंगार कोण? याबाबत बोलू. असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

तसेच पुढे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर भाष्य करत संजय राऊत म्हणाले आहेत की, पक्ष आहे म्हणून दौरा केला जातोय, तुमचा मुख्यमंत्र्यांचा पक्ष आहे तो चोरलेला पक्ष आहे.- स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी. कोणी काकाचा पक्ष चोरतो, कोणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतो. दिल्लीचे यांचे जे दोन अनौरस बाप आहेत त्यांच्या जीवावर हे पक्ष चोरत आहेत. मग एकनाथ शिंदे असो की अजित पवार असो, त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

दरम्यान जर कुणी निवडणुकांसाठी किंवा पदासाठी पक्ष बदलणार असतील, तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरु झाली आहे. त्या परंपरेनुसार, ते (मिलिंद देवरा) पक्ष बदलणार असतील, तर त्यावर काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी. मी यावर का बोलू, माझा आणि माझ्या पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. दक्षिण मुंबईची जागा आमचीच आहे, अरविंद सावंत दोनदा निवडून आले आहेत’, असे राऊत म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.