नव्याने सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसची बैलाला धडक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वंदे भारत एक्सप्रेसला प्राण्यांची धडक होण्याच्या घटना सतत समोर येत आहे. यादरम्यान अगदी १५ दिवसांपूर्वी सुरु झालेल्या मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसला देखील असाच अपघात झाला आहे. या रेल्वेगाडीची बैलाला धडक झाली असून, अशाच प्रकारचा पहिला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ६.१५ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोटुळ शिवारात हा अपघातात झाला. तब्बल १ हजार फुटांपर्यंत एक्स्प्रेसने या बैलाला फरफटत नेले आहे.

या दुर्घटनेनंतर बैलाचे डोके, पाय तुटून मांस विखुरले होते. अपघातात रेल्वेचा ब्रेक पाइपसह इंजिनचे मोठे नुकसान होऊन तब्बल १ तास गाडी गाडी खोळंबली होती. दरम्यान दुरुस्तीनंतर रात्री ७.१० वाजता वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाली. संभाजीनगरात ती ३४ मिनिटे उशिरा म्हणजे ७.४२ वाजता पोहोचली.

संभाजीनगर विभागाकडे इलेक्ट्रिक राखीव इंजिन नसल्याने रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे रेल्वेतील ३५० प्रवासी ताटकळत होते. ता दरम्यान काही गाड्यांना दौलताबाद व लासूर स्टेशन स्थानकावर थांबविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.