मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

0

मुंबई ;- माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून आपण काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ट्विट रविवारी सकाळी देवरा यांनी केले. लोकसभा उमेदवारीसाठी त्यांची धडपड सुरू असून ते  शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू आहे. अखेर आज सकाळीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासी असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.