मोठी बातमी; योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मुंबईहून ताज केली आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोपीने एक पोस्ट टाकली होती. यामध्ये त्याने प्रेम यादव हत्या प्रकरणात ब्राम्हण महासभा आणि मीडियाने त्याचे घर पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, जर घर कोसळले तर, योगींची हत्या नक्की होईल, असे आरोपीने म्हटले आहे. यानंतर रुद्रपूर कोतवाली पोलिसांनी आयपीसी कलम ५०५ (२), ५०६ आणि ६७ आयटी अॅक्ट अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. सायबर सेलला आरोपीचे महाराष्ट्रातील मुंबई हे ठिकाण सापडले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून आरोपीला अटक केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अजित यादवला देवराया पोलिसांनी मुंबईतून अटक केली. आरोपी मुलाचा भदोही जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुंबईत मुंबईत वडिलांसोबत राहून तो पदवीचे शिक्षण घेत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.