सांगवी शिवारातून पीव्हीसी पाईपची चोरी

0

यावल;- तालुक्यातील सांगवी खुर्द शिवारातील एका शेतातून नऊ हजार किमतीचे २४ पीव्हीसी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार पाच ते सहा रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यावल तालुक्यातील अट्रावल येथील शेतकरी ललित अशोक महाजन वय 32 यांचे सांगवी खुर्द शिवारात शेत असून त्यांच्या शेतातून नऊ हजार रुपये किमतीचे पीव्हीसी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार सहा रोजी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी ललित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश सानप करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.