ऐनपुर आरोग्य केंद्रात एकाच वैद्यकीय अधिकार्यांवर भार; आरोग्य केंद्रात दररोज १००च्या वर ओपीडी

0

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऐनपुर येथे दर कार्यालयीन दिवशी १००च्या वर रुग्णांची ओपीडी होत असून त्यासाठी फक्त एकच वैद्यकीय अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी दिसत असून त्यांना ओपीडी सांभाळावी लागत आहे.

सविस्तर वृत्त असे की,शासनाने सर्व शासकीय आरोग्य विभागात मोफत उपचारबाबत घोषणा करून अमलबजावणी केल्यामुळे तसेच वातावरणात बदल तसेच सर्दी, खोकला अश्या संसर्गजन्य आजारामुळे ऐनपुर सारख्या आरोग्य केंद्रात ओपीडी रुग्णांची संख्या ही दिवसेदिवस वाढत आहे. आज दिनांक ७ रोजी जवळपास १०७ च्यावर रुग्ण होते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ कुणाल पाटील हे एकच वैद्यकिय अधिकारी हजर होते, तसेच इतरही कर्मचारी उपस्थित होते. परंतु बाहेर आरोग्य अधिकारी यांच्या कक्षबाहेर तालुका वैद्यकीय अधिकारी व दोन वैद्यकीय अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक दिलेले आहे. जर दिलेल्या फलकानुसार दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतील तर एवढे रुग्ण सोडून दुसरे वैद्यकीय अधिकारी गेले कुठे? जर का इमर्जंसी रुग्ण आल्यास कार्यरत वैद्यकीय अधिकारी ओपीडी सांभाळतील की इमर्जन्सी असा प्रश्न निर्माण होतो.

ऐनपुर या आरोग्य केंद्राला बरीच लहान मोठे खेडे जोडलेले असताना, तसेच वातावरणीय बदलामुळे वाढते रुग्ण अशा या समस्येवर एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने आरोग्य अधिकारी व विभाग याकडे गांभीर्याने लक्ष घालतील का? की अशीच रुग्णांची गैरसोय होणार. अक्षरशः आज दि.७ रोजी ऐनपुर आरोग्य केंद्रात रुग्णांची असलेली गर्दी बघता वैद्यकीय अधिकारी(आरोग्य अधिकारी) कक्षेत रुग्णांची गर्दी जमलेली होती, तर बाहेरही रुग्ण रांगेत उभे होते.
याबाबत फलकावर असलेल्या इतर वैद्यकीय अधिकारी डॉ चंदन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

आरोग्य केंद्रात कार्यरत नसलेल्या डॉक्टरांचे नाव फलकावर असल्याने गोंधळ
मिळालेल्या माहिती नुसार, डॉ चंदन पाटील हे ऐनपुर आरोग्य केंद्रात कार्यरत नाही तरी कक्षेबाहेर फलक जैसे थे असून फलक अद्यावत केलेले नाही, ही जबाबदारी अधिकारी विसरले कसे, की अश्या प्रकारचे फलक नियमानुसार मान्य आहे असा संभ्रम होत आहे. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ महाजन यांना विचारले असता डॉ चंदन पाटील आपल्याकडे कार्यरत नसल्याचे सांगितले. तसेच आपल्याकडे एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहे तर दुसरे डॉक्टर वर्मा हे पुढील शिक्षणासाठी गेल्या मुळे ती जागा रिक्त झाली आहे. आपण त्यासाठी मागणी केली आहे व करणार आहे.

विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आठवड्याभरापूर्वी ऐनपूर येथील आरोग्य केंद्राला भेट दिली होती. मग त्यांनी या समस्या जाणून घेतल्या नाही का, तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी कर्मचारी अपूर्ण संख्येबाबत व त्यामुळे निर्माण होत असल्या समस्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे मांडल्या का नाही असा प्रश्न निर्माण होतो

 

Leave A Reply

Your email address will not be published.