आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून 78 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजण्यात आली आहे. कोसळलेल्या इमारतींखाली लोक दबले गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत लोकांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. अंतिम आकडा अद्याप आलेला नाही.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू या प्रदेशातील सर्वात मोठे हेरात शहराच्या वायव्येला 40 किलोमीटर (25 मैल) दूर होते. त्यानंतर 5.5, 4.7, 6.3, 5.9 आणि 4.6 पाच आफ्टरशॉक आले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घरे आणि कार्यालयीन इमारतींमधून बाहेर आले.