छत्रपती संभाजीनगर नामांतराची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) हे नाव बदलून औरंगाबाद (Aurangabad ) करण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. केंद्राने देखील या दोन्ही शहरांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मोहंमद हाशम उस्मानींसह इतरांनी मात्र याच निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर हे प्रकरण हायकोर्टासमोर असताना या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून लावली आहे. कोणत्याही शहर, रस्त्यांची नावे बदलण्याचा अधिकार हा संपूर्णपणे लोकनियुक्त सरकारचा असल्याचं देखील न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. जे.बी. पारडीवालांच्या खंडपीठापुढे विशेष अनुमती याचिका सुनावणीस आली होती, त्यावेळी त्यांनी हा निणर्य दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.