तापमान वाढीत ‘पुणे’ दुसऱ्या क्रमांकावर

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

फेब्रुवारी (February) महिन्यानंतर एप्रिल महिन्यात तापमानाने लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी दहापासून सुरू झालेला उन्हाचा चटका आता सायंकाळी पाचपर्यंत जाणवत आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे. रस्त्यांवर प्रचंड उन्हाचा चटका, तर घरामध्ये उष्म्याच्या झळा येत असल्याचा अनुभव येत आहे.गेले सलग चार दिवस पुण्यातील तापमान चाळिशीच्या पलीकडेच आहे. शहरात भर दुपारी फिरताना सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याचे जाणवत आहे.

कायम थंड वातावरण अशी ओळख असलेल्या पुण्याची आता हॉट सीटी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाची शक्यता सांगितली होती. मात्र उन्हाचा कहर वाढत आहे. बुधवारी रोजी पुन्हा पारा वर चढला आहे.सरासरी कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदवलं जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक तापामानात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, चंद्रपूर नंतर आता पुणे सर्वात उष्ण शहर झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.