रोहित शर्माने सांगितले कधी घेणार निवृत्ती ?

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

टीम इंडियाने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ४-१ ने जिंकली. या मालिकेतील विजयासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर चाहत्यांना वाटले की ही मालिका खूपच रोमांचक होणार आहे, परंतु टीम इंडियाने त्या सामन्यानंतर आणखी जोरदार पुनरागमन केले. आणि या मालिकेत इंग्लंड संघाला एकही सामना जिंकता आला नाही. या संपूर्ण मालिकेत इंग्लिश संघाविरुद्ध रोहित शर्माचे कर्णधारपद उत्कृष्ट ठरले. दरम्यान, सामना संपल्यानंतर रोहित शर्माने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

निवृत्तीवर कॅप्टन रोहित काय म्हणाला?

धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यातील विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने जिओ सिनेमाशी बोलताना आपल्या निवृत्तीबाबत वक्तव्य केले आहे. तो क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार आणि यावेळी त्याला कसे वाटते हे त्याने सांगितले आहे. तो म्हणाला एक दिवस मी झोपेतून उठलो आणि असं वाटल की मी बरे करत नाहीये, तेव्हापासून मी क्रिकेटपासून दूर होईल. गेल्या २-३ वर्षांत मी माझ्या खेळात सुधारणा केली आहे, असे मला वाटते. रोहित शर्माच्या या वक्तव्याने करोडो चाहत्यांची मने तुटली आहेत. रोहित शर्माचे हे शब्दही खरे आहेत, तो गेल्या काही वर्षांपासून खूप चांगले क्रिकेट खेळत आहे.

रोहित शर्माने भारतीय कर्णधार म्हणून 115 सामने खेळले आहेत. जिथे त्याने 85 विजय आणि 26 पराभवांची नोंद केली आहे. दोन सामने अनिर्णित आणि एक रद्द झालेल्या सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माने 15 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. या सामन्यांमध्ये नऊ विजय आणि चार पराभव पत्करले आहेत. रोहितची विजयाची टक्केवारी ६९.२३ आहे. रोहित शर्माचा कर्णधार म्हणून आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला असून जून महिन्यात तो टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.