नागपूर ;- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुती बाबत दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली असून ८० टक्के प्रश्न सुटले आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील जागावाटपासाठी युतीचे भागीदार एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला फडणवीसही उपस्थित होते.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे. या बैठकीबाबत नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “कालच्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. मी म्हणू शकतो की आमचे 80 टक्के प्रश्न सुटले आहेत, आणि उर्वरित 20 टक्के समस्यांवर चर्चा सुरू आहे. आणि माझा विश्वास आहे बाकीचे प्रश्न लवकरच सोडवले जातील. असं फडणवीस यावेळी म्हणाले.