पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात केली जंगल सफारी

0

आसाम ;-काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आसाम दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी पोहोचले. पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान ते हत्तीवर बसून जंगल सफारीला गेले. यानंतर जीपमधून नॅशनल पार्कलाही भेट दिली.

यावेळी उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि वरिष्ठ वन अधिकारीही त्यांच्यासोबत होते. मोदींनी जंगल सफारीदरम्यान प्राण्यांचे फोटोही काढले. X वर ही छायाचित्रे पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, प्रत्येकाने या राष्ट्रीय उद्यानात यावे. त्यांनी हत्तींना ऊस खाऊ घालतानाचा फोटोही पोस्ट केला. त्यांनी लिहिले की हे ठिकाण गेंड्यांसाठी ओळखले जाते, परंतु येथे हत्तींची संख्याही जास्त आहे.

पंतप्रधान मोदी ईशान्येच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ते आसाममधील तेजपूरला पोहोचले. काझीरंगा नॅशनल पार्कच्या गेस्ट हाऊसमध्ये रात्री मुक्काम केला. काझीरंगाला 1974 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आणि यावर्षी काझीरंगा या यशाचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. काझीरंगा 1985 मध्ये जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.