बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क
बारामतीमधून मोठी बातमी समोर आलीय. शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) धाड पडल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळी ईडीचे पथक बारामती अॅग्रोमध्ये पोहोचले. या कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे.
राष्ट्रवादीमध्ये उभी पडून अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पण शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे थोरल्या पवारांसोबतच राहिल्या. विरोधी पक्षात असलेल्या रोहित पवारांच्या कंपन्या केंद्रीय व राज्यातील यंत्रणांच्या रडारवर आहेत. दरम्यान या प्रकरणी कंपनी प्रशासनानं कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
https://x.com/RRPSpeaks/status/1743147999952572488?s=20
रोहित पवारांचे ट्विट
हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्रधर्म जपला आणि वाढवला… अन्याया विरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.