काय सांगता…इलॉन मस्क उभारणार स्पेसमध्ये उभारणार मोबाईल टॉवर ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचे स्टारलिंक हे आतापर्यंत केवळ सॅटेलाईट इंटरनेट सेवा उपलब्ध करून देत होत. मात्र, आता नव्या सॅटेलाईटच्या माध्यमातून स्पेसएक्सने थेट मोबाईल टॉवरच अवकाशात लाँच केला आहे. जगभरात कुठल्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तीला मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावं यासाठी मस्कने ही नवीन मोहीम हाती घेतली आहे.

स्पेसएक्सने नुकतेच अवकाशात २१ नवे हायटेक उपग्रह लाँच केले आहे. यापैकी ६ उपग्रह हे इनोव्हेटिव्ह ‘डायरेक्ट टु सेल’ सेवेला सपोर्ट कारण्यासाटःई तयार केले आहे. या माध्यमातून जागतिक स्तरावर डेड झोन्स संपवण्याच्या उद्दिष्टाने लाँच केले आहेत. एलॉन मस्कने २०२२ सालीचा याबाबत घोषणा केली होती

सध्या अमेरिकेत नेटवर्क
ही मोहीम यशस्वी झाल्यास सुरुवातीलाच अमिरेकेत टी-मोबाईल नेटवर्क असणाऱ्या 4G-LTE फोनवर याची चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर यातच टेक्स्ट मेसेजिंग सेवा इतर देशांमध्येही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती स्पेसएक्सने दिली.

संपूर्ण जगात मोबाईल नेटवर्क
इलॉन मस्कने स्पेसएक्सची पोस्ट एक्सवर (ट्विटर) शेअर केली आहे. “या मोहिमेमुळे जगभरात कुठेही मोबाईल नेटवर्क उपलब्ध होणार आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या नेटवर्क्सना मात्र यामुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही” असं मस्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.