धक्कादायक; क्लीनिकमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईच्या मालंडमधील एका दातांच्या दवाखान्यात धक्कादायक घटना घडली आहे. या क्लीनिकमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. सादर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उसळी आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा मृतदेह क्लीनिकमध्ये लटकलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. माझी मुलगी आत्महत्या करणारी नव्हती. तिला हे करण्यासाठी बळी पाडलं आहे. काही दिवसांपूर्वी डॉटरांकडून तिला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची माहिती तिने मला दिली होती. त्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही असा दावा तिच्या आईने केला आहे.

आईने दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध आयपीसी कलम ३०६, ३७६ आणि बाल न्याय कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.