घरात घुसून महिलेने लांबवीले पावणेपाच लाखांचे दागिने ; बोदवड येथील प्रकार

0

बोदवड : देवाला कुंकू लावण्याचे सांगत एका महिलेने पती पत्नीचे लक्ष विचलित करीत तब्बल पावणेपाच लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना साखला कॉलनीत शनिवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी 12.25 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बोदवड शहरातील साखला कॉलनीत सुरेखा कैलास शर्मा (45) या पती कैलास शर्मा यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. शनिवार. 30 रोजी दुपारी 12.25 वाजता त्यांच्या घराजवळ एक महिला आली. तिच्या हातात कुंकूवाचा ताट होता. महिलेने देवाला कुंकू लावण्याचे सांगत घरात प्रवेश केला, त्यानंतर स्वच्छतागृहात गेली. तेथून आल्यावर हातात असलेला रूमाल झटकताच सुरेखा शर्मा व त्यांचे पती कैलास शर्मा बेशुद्ध झाले. त्यानंतर या महिलेने घरातील कपाटातून तीन लाख 25 हजारांची रोकड, 17.5 गॅ्रमची सोन्याची पोत, पाच ग्रॅमची अंगठी, सहा ग्रॅम वजनाचे टोंगल असा एकूण चार लाख 78 हजार 20 रुपयांचा ऐवज लांबवला.याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.