बुलढाणा जामनेर रस्त्यावरअनाधिकृत गतिरोधक; लाखो वाहनधारकांचा जीव धोक्यात

0

लोकशाही न्युज  नेटवर्क 

जामनेर;  जामनेर ते बुलढाणा या जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असून या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसतांना मात्र जामनेर जवळ लॉर्ड गणेशा शाळेजवळ मोठे मोठे सहा गतिरोधक टाकून वाहनधारकांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम रस्ता प्रशासनाने केले असून या ठिकाणी शाळा आहे.

मात्र ही शाळा असल्याने यातून कुठलाही मुलगा पायी बाहेर निघत नाही आणि शाळेतून निघणाऱ्या गाड्या सुसाट वेगाने निघतात खऱ्या अर्थाने गतिरोधकाची गरज नाही शाळेतून जो रस्ता येतो त्या रस्त्यावर होती, म्हणजे शाळेतून निघणाऱ्या गाड्या हळू बाहेर येतील मात्र रस्ता प्रशासनाने चक्क बुलढाणा जामनेर की या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

दुचाकी वाहन धारकांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका असून मागील मागे बसलेली महिला बालक कधीही पडू शकते तसेच शाळा प्रशासनाला देखील पर्यायी रस्ता असताना याच रस्त्यावरून वाहने काढण्याचा हट्ट का वाहने बाहेर काढण्यासाठी शाळा प्रशासनाला सामरोद रस्त्या कडून गाड्या काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करता येऊ शकते मात्र शाळा प्रशासन तसे न करता या मुख्य रस्त्यावर गाड्या बाहेर काढून रहदारीस अडथळा निर्माण करत असतात.

तसेच रस्ता बांधकाम प्रशासनाचे ठेकेदार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्हाला कुठलाही गतिरोधक टाकण्याची परवानगी नाही आम्ही तो गतिरोधक टाकला नाही मग या रस्त्यावर गतिरोधक आला कुठून असा प्रश्न आता या परिसरातील लाखो लोकांना पडला आहे.

तसेच  गतिरोधक टाकल्यानंतर दोघे बाजूंनी फलक लावणे बंधनकारक असते मात्र गतिरोधकच बेकायदेशीर असल्याने या ठिकाणी बोर्ड देखील लावता येत नाही या ठिकाणी अपघात झाल्यासअपघातास जबाबदार कोण या कडे बांधकाम विभागाने देखील लक्ष घालून  वाहनधारकांना अपघातापासून वाचावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.