छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा.

0

लोकशाही  न्यूज नेटवर्क 

भुसावळ; आज भुसावळ नगर परिषद हद्दीत विविध विकास कामाच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील शहरात आले होते. एच डी एफ सी बँक जवळील भागात होणाऱ्या विकासकामांच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आटोपून पालक मंत्री यांचा ताफा जात असताना बाजारपेठ पोलिस स्टेशन जवळ वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्या सह थांबले होते.

जसा ताफा जवळ आला तसाच वंचित आपले निवेदन देण्यासाठी पालकमंत्र्यांचा गाडी कडे चालत गेले रस्त्यातच विनोद सोनवणे यांनी पालकमंत्र्यांना निवेदन देत विनंती केली कि , बाजारपेठ पोलिस स्टेशन जवळ जी जागा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ठरली असताना ही गेल्या अनेक वर्षापासून अजून ही शिवरायाचा पुतळा बसविणे सत्ताधाऱ्यांना शक्य झाले नाही.

ज्या महाराजांना अख्खा महाराष्ट्र आपले दैवत मानतो त्या जाणत्या राजाचे पुतळा रुपी स्मारक दुर्लक्षित राहत असेल तर शरमेची बाब आहे.आपण पालकमंत्री आहात राज्यात शिवसेनेचे सरकार आहे तेव्हा शिवरायाचा पूर्णाकृति पुतळा बसवून भुसावळकराची इच्छा पूर्ण कराल अशी मागणी निवेदन सादर करते वेळी करण्यात आली. सदर प्रसंगी या आधी याच जागेचे भाजपचे आमदार भूमिपूजन करणारे संजय सावकारे देखील पालक मंत्र्याच्या ताफ्यात हजर झालेले दिसून येत होते.

निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या समवेत वंचितचे जिल्हा महासचिव दिनेश इखारें,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार आघाडीचे बालाजी पठाडे,भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव,जिल्हा महासचिव महिला आघाडी वंदनाताई आराक, जिल्हा संघटक महिला आघाडी शोभाताई सोनवणे,बंटी सोनवणे,तालुका सचिव गणेश इंगळे,मेजर देवदत्त मकासरे,रुपेश कुऱ्हाडे,विजय मालवीय,कुणाल सुरडकर,सुनील ठाकूर आदी सह अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.