कजगाव येथील मन्यार कुटुंबातील सदस्य साखरपुड्यासाठी गेले पण लग्न लावून आले….

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कजगाव; येथील रहिवासी व फळ व्यापारी शेख सम्मद शेख इस्माईल मनियार यांचे द्वितीय चिरंजीव अवेश सम्मद मनियार यांचा विवाह दिनांक 11/2/2022 शुक्रवारी रोजी वाशीम येथील कैसर अहमद सर यांची कन्या उंम्मे जवेरीया यांच्याशी ठरला परंपरेप्रमाणे मनियार परिवार हे वासिम येथे साखरपुड्यासाठी गेले पण आपण दोघी परिवारातील सदस्य यांनी साखरपुड्याचा विवाह आटोपण्याचा निर्णय घेतला व दोघ परिवारांनी या निर्णयाचे स्वागत करत विवाह करण्याचे ठरविले.

या निर्णयाला समाजातील इतर जेष्ठ व नातेवाईकांनी पाठिंबा दर्शविला मुस्लिम समाजात विवाह होणाऱ्या खर्चाला बगल देत हा विवाह करण्यात आला या विवाहासाठी दोघे कुटुंबातील व्यक्ती तसेच मनियार कुटुंबातील हाजी शफी शेख इस्माईल मनियार , शेख शाकीर मनियार, सम्मद मनियार, मुस्ताक मनियार , डॉक्टर फारुख ,  शेख असिफ मनियार , सादिक मनियार , शहीद मनियार ,अनिस मनियार , वसीम मनियार, फारुख मनियार ,व सर्व मनियार परिवारातील सदस्य उपस्थित होते.

मुस्लिम समाजातील अशाप्रकारे होणाऱ्या व उरुळी परंपरेला फाटा देणाऱ्या विवाहाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. मुस्लिम समाजा सोबत इतर समाजाने ही अशा प्रकारच्या खर्चाला फाटा देणाऱ्या आदर्श विवाहाचे अनुकरण करण्याची काळाची गरज आहे. या विवाहाचे कजगाव व परिसरातून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.