नियमांचे उल्लंघन.. Axis आणि IDBI बँकेवर RBI ची कारवाई

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना अनेक नियम घालून दिले आहेत, मात्र काही बँकेकडून या नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे आरबीआय कारवाई करते. अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) आणि आयडीबीआय बँक (IDBI Bank) ला रिझर्व्ह बँकेकडून दंड ठोठावण्यात आला आहे.

केवायसी गाईडलाईन्सचे उल्लंघन तसचे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जे नियम तयार केले आहेत, त्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका संबंधित बँकांवर ठेवण्यात आला आहे. आरबीआयने घालून दिलेल्या विविध नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणात हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अ‍ॅक्सिस बँकेला 93 लाखांचा तर आयडीबीआय बँकेला 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील अनेक बँकांकडून नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तर काही बँकांचे परवाने देखील निलंबित करण्यात आले आहेत.

म्हणून ठोठावला दंड

ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आरबीआयच्या वतीने केवासयी आणि बँक खात्यात मिनिमम बॅलन्स संदर्भात काही नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन अ‍ॅक्सिस बँक आणि आयडीबीआय बँकेकडून करण्यात आले. त्यामुळे त्यांना या प्रकरणात दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात अ‍ॅक्सिस बँकेला 93 लाखांचा तर आयडीबीआय बँकेला 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

एका अन्य प्रकरणात सायबर सुरक्षा संबंधात आरबीआयने बनवलेल्या मापदंडाचे उल्लंघन केल्याचा देखील आयडीबीआय बँकेवर आरोप आहे. दरम्यान संबंधित दोनही बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे, याचा ग्राहक व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

चौकशी होणार

दरम्यान सध्या अ‍ॅक्सिस बँक आणि आयडीबीआय बँकेच्या विश्वस्त मंडळाची देखील स्पर्धा आयोगाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात एसबीआयच्या ट्रस्टी युनिटचा देखील समावेश आहे. शुल्कासंदर्भातील संगनमताच्या प्रकरणात सीसीआयकडून ही चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकारच्या चौकशा या बँकिंग अंतर्गंत आहेत, त्यामुळे ग्राहकांच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नसून, ग्राहकांचे व्यवहार सुरळीत सुरू राहातील असे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.