साकरीत धाडसी घरफोडी.. लाखोंच्या रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील साकरी येथील शिवम नगर भागात रात्री चोरट्याने बंद घराचे कुलुप तोडून सोन्याचे दगिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ६,८२,००० हजाराचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अज्ञाताने घरात अनधिकृत प्रवेश करून घरफोडी करून ६,८२,००० सोन्याचे दागिने व रोकड घेऊन अज्ञात चोरटा पसार झाल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गणेश तुकाराम साबरे (वय ४८ रा. आर.बी.१-१२३८/ जी कंडारी रोड भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ०७ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता ते ०८ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांचे मोठे भाऊ मधुकर तुकाराम साबरे यांचे साकरी गावातील शिवम नगर येथील बंद घराचे मेन गेटचे व दरवाज्याचे कुलूप चोरट्याने तोडून घरात अनधिकृत प्रवेश करून घरफोडी करून घरातील बेडरूममधील लाकडी फर्निचरमध्ये ठरलेले लोखंडी पत्री पेटीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ६,८२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला.

याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या आदेशावरून गुरुन ४७/२०२२ भा.द.वि कलम ४५४,४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अमोल रामचंद्र पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.