कृषिपंपांना आठ तास अखंडितपणे वीज पुरवठा सुरळीत करावा- खा. उन्मेष पाटील

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषिपंपांना आठ तास अखंडितपणे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे. तसेच सदर मागणी पूर्ण न झाल्यास वीज वितरण कंपनी विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेवून आंदोलन करू असा तीव्र इशारा पाटील यांनी दिला आहे.

सदर निवेदनात दिले आहे की, माझ्या मतदार संघातील बहुतांश गावांमध्ये गेल्या आठवड्याभरात वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या अनेक तक्रारी मला प्राप्त झालेल्या आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने कृषिपंपांना किमान आठ तास वीज देण्याचे धोरण असताना माञ कुठे चार तास तर कुठे दोन तास अखंडित वीजपुरवठा देण्यात येत आहे.

सद्यस्थितीत 45 ते 46 अंश सेल्सियस तापमान असल्याने या कडकडीत उन्हात केळी बागा सह रब्बी मधील मका पिकांसह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीज नसल्याने शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचा संयम संपला आहे. कानळदा आणि भादली सब स्टेशन परिसरात तर अवघा दोन तास देखील वीज पुरवठा दिला जात नसल्याने प्रचंड रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या निवेदनाद्वारे आपणास सूचित करू इच्छितो की आपण तातडीने वीज मंडळांच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन किमान कृषिपंपांना आठ तास अखंडितपणे वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आदेशित करावे अन्यथा वीज वितरण कंपनी विरुद्ध शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलनाची भूमिका घ्यावी असे निवेदनात देण्यात आला.

यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष दीपक दादा सूर्यवंशी, पाचोरा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, भाजपा प्रदेश प्रतिनिधी एडवोकेट विहार आप्पा पाटील, अमळनेर जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष गोपाळ दादा भंगाळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, माजी जि प सदस्य अंदुरे संदीप पाटील, अरुण दादा भाऊ सपकाळे यांचे सहकार्य करते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.