रेल्वेमध्ये 2.4 लाखांहून अधिक पदांवर मोठी भरती

0

नवी दिल्ली ;- रेल्वेमध्ये 2.4 लाखांहून अधिक पदांवर मोठी भरती होणार असल्याचे समजत असून लवकरच रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात येईल. विशेष म्हणजे पात्र उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, रेल्वेच्या सर्व झोनमध्ये गट क पदांवर 2,48,895 पदे रिक्त आहेत. तर गट अ आणि ब पदांमध्ये 2070 पदे रिक्त आहेत. अधिसूचनेनुसार एकूण 1,28,349 उमेदवारांना गट ‘C’ पदांसाठी निवड करण्यात येतील. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला indianrailways.gov.in या साईटवर आरामात मिळेल. तिथेच जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीनेच उमेदवारांना अर्ज करावी लागतील.

Leave A Reply

Your email address will not be published.