गुलाबी नोट बदली करताय? मग रांगेत उभ राहण्यापूर्वी हे कागदपत्र सोबत ठेवा; नाहीतर…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भारतीय लोक अजूनही १००० आणि ५०० च्या नोटबंदीच्या धक्क्यातून सावरत नाहीत तोच 19 मे 2023 रोजी शुक्रवारी संध्याकाळी भारतीय रिझर्व्ह बँकेने अचानक दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली. या गुलाबी नोटा कशा बदलायच्या याविषयी लोकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून तशाही या नोटा फारशा चलनात दिसल्या नाहीत. ज्यांच्याकडे या नोटा नाहीत, त्यांना चिंता नाही. या नोटा बदलण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. बँका आणि व्यावसायिक मध्यस्थी केंद्रात तुम्हाला या नोटा बदलता येतील. बँकेचे खाते नसले तरी बँकेत जाऊन या नोटा बदलता येतील. नोटा बदलायच्या नसतील तर खात्यात जमा करता येतील. 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. तोपर्यंत या नोटा व्यवहारात वैध आहेत.

 

23 मे 2023 पासून या नोटा बँकांमध्ये जाऊन बदलता येतील. एका दिवशी 2,000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलता येतील. मात्र एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, केवळ रांगेत उभं राहिलं की झालं, असं अजिबात होणार नाही. बँकेत गेल्यावर तुम्हाला एक अर्ज भरुन द्यावा लागेल. हा अर्ज बँकेत उपलब्ध असेल. ग्राहकाला बँकेतच तो भरुन देता येईल. अथवा घरी जाऊन भरुन पुन्हा बँकेत येता येईल.

त्याचबरोबर बँकेत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुमचे मुळ ओळखपत्रही सोबत ठेवावे लागणार आहे. यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, नरेगाकार्ड, पॅनकार्ड अथवा इतर संबंधित ओळखपत्र यापैकी एक सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्याची झेरॉक्सही सोबत ठेवावी लागेल.

 

सोप्या पद्धती वापरा…

  • या अर्जात सर्वात अगोदर बँकेच्या शाखेचे नाव द्यावे लागेल
  • तुमच्या बँकेचे खाते असेल तर त्या खात्याचा क्रमांक नोंदवावा लागेल
  • त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव लिहावे लागेल
  • या अर्जासोबत ओळखपत्राची एक झेरॉक्स जोडावी लागेल
  • अर्जावर संबंधित आयडी कार्डचा क्रमांक नोंदवावा लागेल
  • 2,000 रुपयांच्या किती नोटा बदलायच्या ती माहिती द्यावी लागेल
  • या नोटांचे एकूण मूल्य, म्हणजे किती हजारांच्या नोटा बदलवणार आहात, त्याची माहिती द्यावी लागेल
  • सर्वात शेवटी नोटा बदलवणाऱ्याला त्याची स्वाक्षरी करावी लागेल
  • त्याखाली तारीख आणि ठिकाण लिहावे लागेल

 

कुठलाही गैरसमज करण्याआधी हे वाचा…

  • सोप्या शब्दात नोटा चलनातून बाहेर करण्यात आल्या आहेत
  • या नोटा लगेचच बंद करण्यात आल्या नाहीत, त्या अजून चार महिने चलनात आहेत
  • या नोटांना हळूहळू व्यवहारातून संपूर्णपणे बाहेर करण्यात येईल
  • नागरिकांना त्यांच्याकडील 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील
  • एका वेळी ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंतचं या नोटा जमा करता येतील
  • या 23 मे पासून नागरिकांना केंद्र सरकारच्या बँकेत या नोटा जमा करता येतील

Leave A Reply

Your email address will not be published.