भरत जाधवांची मोठी घोषणा; नाट्यसृष्टीसह महाराष्ट्र हादरला…(व्हिडीओ)

0

 

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भरत जाधव हे मराठी रंगभूमी असो, कि चित्रपट यातील ते आघाडीचे कलावंत आहेत. त्यांच्या विनोदाच्या टायमिंग अत्यंत नैसर्गिक आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. मात्र भरत जाधव यांनी रत्नागिरीत नाटकाचा प्रयोग करतांना अशी काही घोषणा केली कि ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रत्नागिरीत पुन्हा नाटकाचे शो करणार नाही असा निर्धार अभिनेता भरत जाधव यांनी केला आहे. नेमकं अशी घोषणा करण्यामागे काय घडलं. भरत जाधव एवढे नाराज का झाले हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरत जाधव यांनी रत्नागिरीतील नाट्यगृहांची अवस्था चव्हाट्यावर आणली आहे. मेकअप रुम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्याठिकाणी एसी नसल्याने भरत जाधव नाराज झाले आहेत. एवढंच नाही तर साऊंड सिस्टिंमवरून त्यांनी खेद व्यक्त केला आहे. शनिवारी रत्नागिरीत तू तू मी मी या नाटकाचा प्रयोगावेळी भरत जाधव यांनी ही समस्या मांडली आणि परत रत्नागिरीत पाय ठेवणार नाही अशी घोषणाच केली. नाटक सुरु असतानाच भरत जाधव प्रेक्षकांना म्हणाले की, “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पहा” नाट्यगृहाची अशी अवस्था असताना प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता? असा प्रश्न विचारत त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत, पुन्हा रत्नागिरीत शो करणार नाही, असं सांगितलं.

एखाद्या कलाकारावर असे प्रयोग थांबून नाट्यगृहाची अवस्था अशी चव्हाट्यावर मांडण्याची वेळ यावी, असे अतिशय दुदैवी गोष्ट आहे. भरत जाधव यांच्या घोषणेनंतर तरी सांस्कृतिक मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जाग येईल का? हे बघावं लागेल. पण रत्नागिरीकरांसाठी ही अशी नामुष्की आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.