अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या एका खासगी बसचा भीषण अपघात लोणीकंद येथे पुणे – अहमदनगर महामार्गावर झाला आहे. ड्रायव्हरचे सकाळी 7 वाजेच्या सुमारास बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, अपघातात चार ते पाच जण जखमी झालेत. जखमींवर उपचार सुरू असून, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, या खासगी प्रवासी बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पटली झालेली बस उचलण्यासाठी घटनास्थळी क्रेन दाखल झाली आहे. दरम्यान, पुणे – नगर महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

बसमधील प्रवाशी हे अष्टविनायक दर्शन घेण्यासाठी चालले होते. पुणे – अमहदनगर महार्मागावरुन ही बस निघाली होती. पुणे येथील प्रवाशी या बसमधून श्रीक्षेत्र रांजणगाव येथे निघाले होते. मात्र, वाघोलीच्या पुढे असणाऱ्या लोणीकंद येथील पुलगाव गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या लोहगाव, वाघोली आणि शिक्रापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.