जाणून घ्या कधी पर्यंत बदलता येणार २ हजारांच्या नोटा…

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

२ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (Reserve Bank of India) ने घेतला असून, दि २३ मे पासून नोटा बदलण्याची आणि जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांना बँकेमध्ये जावे लागेल. जर तुमच्या कडे २ हजारांच्या नोटा असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन नोट बदलू शकता. याशिवाय तुम्ही हे पैसे खात्यातही जमा करू शकता.

त्यासोबतच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी एक दिवस अगोदर नागरिकांना नोटा बदलण्याची घाई करू नका, असे आवाहन केले आहे. जनतेला केले आहे. 2000 रुपयांची नोट वैध असून पुढील चार महिन्यांत ती कधीही बदलता येणार आहे.

शेवटची मुदत
आरबीआयकडून 2000 रुपयांची नोट 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये बँकांमध्ये जाऊन बदलता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तुम्ही 2000 रुपयांची नोट बदलून ते पैसे खात्यातही जमा करू शकता. एका वेळी फक्त 10 नोटा बदलता येणार आहे. आरबीआयने आदेशात असेही म्हटले आहे की, 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढली जात आहे. तुम्ही या नोटांवर वस्तू खरेदी करू शकता.

नोटा बदलण्यास पैसे लागणार?
बँकेतून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही, असे आरबीआयने आधीच स्पष्ट केले आहे. तुम्ही बँकेत जाऊन कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुमच्या 2000 रुपयांच्या 10 नोटा एकावेळी बदलून घेऊ शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.