अभिमानास्पद; नीरज चोप्राची ‘या’ मोठ्या विक्रमाला गवसणी….

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताचा भालाफेक (Javelin throw) खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) मध्ये झळकला आणि त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताचे नाव उंचावले आहे. नीरज चोप्राने आता मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने २२ मे रोजी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत भालाफेकच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. पुरुषांच्या भालाफेकपटुंच्या यादीत भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्या स्थानी पोहोचला आहे. ही कामगिरी करत त्याने इतिहासाला गवसणी घातली आहे.

वर्ल्ड ॲथलेटिक्सने (World Athletics) जाहीर केलेल्या यादीत नीरज चोप्राने १४५५ पॉईंट्सची कमाई केली आहे. यासह त्याने विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला मागे सोडलं आहे. नीरज चोप्रा हा अँडरसन पीटर्सपेक्षा २२ पॉईंट्सने पुढे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.