क्रिकेटर शुबमन गिलची नवी इनिंग, हॉलिवूड चित्रपटात करणार ‘हे’ काम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

शुबमन गिल (Shubman Gill) सध्या जास्तच चर्चेत आहे. कधी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खान (Sara Ali Khan) वरून, पण आता तो चर्चेत यायचं खरं कारण म्हणजे त्याचा हॉलिवूड (Hollywood) चित्रपट, ‘स्पायडर-मॅन अक्रॉस द स्पायडर व्हर्स’ (Across the Spider-Verse) या हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे, भारताचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल याने या चित्रपटात आपला आवाज दिला आहे. हा चित्रपट एकूण १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याने चित्रपटात हिंदी आणि पंजाबी भाषेत आपला आवाज दिला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, हा संपूर्णपणे अ‍ॅक्शनने भरलेला आणि मनोरंजनाने परिपूर्ण आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हेली स्टेनफेल्ड, ऑस्कर आयझॅक आणि जॅक जॉन्सन यांच्यासह अनेक कलाकारांनी याच्या इंग्रजी आवृत्तीसाठी आवाज दिला आहे. हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी व्यतिरिक्त हा चित्रपट तमिळ तेलुगू, गुजराती, मराठी, बंगाली, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.