शिरसमणीत भरदिवसा घरफोडी; ३ लाखाचा ऐवज लंपास…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे दि २० रोजी भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपायांचा मुद्देमाल लंपास केल्याव्ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरसमणी गावातील शेतकरी रवींद्र रामभाऊ पाटील हे कुटुंबासह सकाळी घर बंद करून आपल्या शेतात ठिबक नळ्या जोडण्यासाठी गेले होते. सायंकाळी ते परत आले असता त्यांच्या मुलांना घराचे कुलूप उघडे दिसले. त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाट उघडे दिसून आल्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले. चोरी मध्ये सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने तर  एक लाख ९८ हजार रु रोख असा एकूण साडेतीन लाख रुपायाचां ऐवज चोरी झाल्याची फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.