जखमेवरचा रामबाण उपाय : पानफुटी / रक्तबंदी

0

लोकशाही विशेष लेख 

कुंडीत होणारी, दोन फुटांपर्यंत उंचीची व समोरासमोर, जाडसर पाने असलेली ही वनस्पती आहे. पानाची कड ही अनेक लहान गोलाकारांनी बनलेली असते. पानाच्या या कडेला फुटवा येतो व त्यातून नवीन झाड जन्मला येते, म्हणून हिला पानफुटी म्हणतात. शिवाय रक्त वाहणे बंद करण्यासाठी वापरतात. म्हणून रक्तबंदी असेही म्हटले जाते.

 

गुणधर्म –

१) जंतुनाशक, २) रक्तस्तंभक, ३) दाह थांबवते – शीतल, ४) जखम भरून काढते. पाने (ठेचून वा रस काढून )

आरोग्यासाठी उपयोग –

१) जखमा – खेळताना लागते, जखम होते, रक्त येते. अशा लहान जखमांवर रक्तबंदीचे पान हातावर चिरडून व पिळून तो रस जखमेवर सोडावा. रक्त वहाणे लगेच थांबते. पण जखम मोठी असेल तर दोन-चार पाने ठेचून तो लगदा जखमेवर ठेवून वर कापडाची पट्टी हलकीशी बांधावी. रक्त वहाणे थांबते व पुढे जखम पुवळत नाही. सकाळी वा पुन्हा सायंकाळी रक्तबंदीचा ठेचा लावून बँडेज करावे.

२) पुवळणे – शरीरावर एखादा फोड होते. दुर्लक्ष केल्यास तो मोठा होतो. पुवळतो, त्या वेळी तापही येतो. अशा वेळी पानफुटीचे पान लावून बांधावे. पान फोडावर ठेवताना पानाची खालची शिरा असलेली बाजू पुवळलेल्या लालसर भागावर आली पाहिजे. (पान उलटे, वरची बाजू फोडाला स्पर्शन बांधू नये) काही तासात ठणका थांबतो. पुवाचा निचरा होतो. त्या वेळी पुन्हा पानफुटीच्या पानाचा लगदा बांधावा दिवसातून दोनदा बँडेज करावे. प्रत्येक वेळी एका पानाचा लगदा वापरावा. म्हणून हे झाड कायमचे कुंडीत वाढू द्यावे.

३) भाजणे – निरनिराळ्या कारणांनी अपघात होऊन आंग भाजते. त्या भागातील त्वचेची प्रचंड आग होऊ लागते. अशा वेळी पानफुटीची दोन पाने ठेचून त्याचा लगदा त्या भाजलेल्या त्वचेवर लावावा. पाच मिनिटांत आग थांबते. त्यानंतर त्या लगद्यावर हलकेसे बँडेज बांधावे.

४) मुतखडा – सर्व ठिकाणचे पाणी ‘मृदु’ पाणी नसते (क्षारांचे कमी प्रमाण) काही भागात पाण्यात जास्त क्षार असतात. त्यामुळे त्या भागात रहाणाऱ्या लोकांना मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते. उदा. राजस्थान. त्या प्रांतात घरोघरी पानफुटीची झाडे कुंडीत लावलेली असतात. प्रत्येक जण एक पान रोज खातो. त्यामुळे मूतखडा होत नाही. पण तो झाल्यास, पानफुटीचे पान खाताना त्याबरोबर एक मिरीचा दाणा चावून खातात. शक्यतो हे सर्व सकाळी उपाशी पोटी करावे. सुमारे तीन – चार दिवसांत पडतो. मूतखडा राजस्थानात केला जाणारा उपाय हा शून्योपचारच आहे.

५) स्तनातील गाठ – अर्भकांना स्तन्य पाजणाऱ्या मातांना टाळू लागून स्तन सुजतो. त्यात गाठ होते. तेथे अतिशय आग होते. स्तनांचा आकार वाढतो. असा विकार झाल्यास पानफुटीची एक वा दोन पाने ठेचून त्या स्तनावर बांधावीत अल्पकाळात आग थांबते. तासाभरात स्तनातील गाठ फुटते. पू वाहून जातो. स्तन साफ बरा होतो.

६) बऱ्या न होणाऱ्या जखमा / जीर्णव्रण – मधुमेह, महारोग,गँगरीन अशा रोगांतील जखमा बऱ्या होत नाहीत असे मानले जाते. ‘परंतु पानफुटीच्या रसात तिळाचे तेल सिद्ध केले तर त्याने जगातली कोणतीही जखम भरून येते.

 

पानफुटीचे तेल काढण्याची कृती

पानफुटीच्या आठ-दहा पानांचा ठेचून लगदा करा किंवा मिक्सरवर करा. तो फडक्यातून पिळून घ्या. सुमारे तीन-चार चमचे रस मिळेल. त्यात तितकेच तिळाचे तेल व तितकेच पाणी घालून मिसळा व मंदाग्नीवर ठेवून उकळू द्या. आतील पाणी उडून गेल्यावर ते पुन्हा गाळून घ्या. पानफुटीचे तेल मिळते. ते बाटलीत भरून ठेवा.

फायदा : या तेलाने कोणतीही जखम भरून येते.

संतोष ढगे, सांगली

८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.