जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
यंदाचे वर्ष हे देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी हर घर तिरंगा मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्याच धरतीवर जळगाव शहरात राष्ट्रप्रेमाची भावना आणि राष्ट्रीय एकात्मता जागवी, म्हणून जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ७५ फुट भव्य राष्ट्रध्वजाची रॅली काढण्यात आली.
दरम्यान ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन त्यानिमित्ताने सकाळी ९ वाजता शास्त्री टॉवर चौकात सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. रॅली दरम्यान भारत मत कि जय… वंदे मातरम्… बिरसा मुंडा अमर राहे च्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. टॉवर चौक येथून रैली चित्रा चौक, नवीपेठ, म.न.पा, नेहरु चौक पुढे शिवतीर्थ मैदान येथे पोहोचून राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली.
कार्यक्रमा दरम्यान आमदार सुरेश भोळे (राजु मामा), भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माजी प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मा. महापौर भारती सोनवणे , प्रभाकर सोनवणे, कैलास सोनवणे, विधान क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, दीप्ती चिरमाडे, भा.ज.युमो सरचिटणीस अक्षय जेजुरकर, महेश पाटील, जितेंद्र चौथे, उपाध्यक्ष रियाझ शेख, सचिन बाविस्कर, स्वामी पोतदार, राहुल मिस्त्री, चिटणीस रोहित सोनवणे, सागर जाधव, जयंत चव्हाण, मयूर भोई, अश्विन सैंदाणे, गौरव पाटील, हर्षल चौधरी, निखिल सूर्यवंशी, सागर पोळ, पंकज गागडे, बाळू मराठे, रुपेश मौर्य, रेखा कुलकर्णी, बापू ठाकरे, भगत सिंग निकम, नगरसेवक विरेन खडके, महेश चौधरी, रंजना वानखेडे, मयूर कापसे, राजू मराठे, भरत सपकाळे, शिवा कंडारे, योगेश पाटील गायत्री राणे, दीपमाला काळे, सुचिता हाडा, चंद्रशेखर पाटील, विजय पाटील, अतुल बारी, सुरेखा तायडे, योगेश बागडे, विठ्ठल पाटील, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, अक्षय चौधरी, परेश जगताप, विजय वानखेडे, शक्ती महाजन, अजित राणे, संजय लुल्ला, जयेश भावसार, लता बाविस्कर, प्रल्हाद सोनवणे, अरुण श्रीखंडे, प्रभाकर तायडे, उमेश सूर्यवंशी, मंगेश वाघ, हर्षल सोनवणे, बाळा सोनवणे, योगेश सुरळकर आदि. तर, ५०० हुन अधिक भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.