महापुरुषांच्या गुणांचे जीवनात अनुकरण करावे

0

प्रवचन सारांश  –  दि.  9 ऑगस्ट 2022

जो मननशील असतो तो मानव असतो. मनन कसे करावे? चिंतन कुणाचे करावे? हा खरा प्रश्न आहे. चिंता व चिंतन हे दोन शब्द आहेत. मनन कसे करावे ? किंवा चिंतन कुणाचे करावे ? याबद्दल ‘मेरी भावना’ या रचनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. पदमचंद्रमुनी यांचे शिष्य पू. जयपुरंदर मुनी यांची ‘मेरी भावना’ प्रवचन शृंखला सुरू आहे. जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर पूज्य. आचार्यश्री पार्श्वचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांचा चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.

आगम शास्त्रात ध्यानाचे चार प्रकार सांगितले आहेत. अंतर्ध्यान व रुद्रध्यान हे दोन ध्यान वर्ज्य मानलेले आहेत. प्रभु व गुरूंचे ध्यान केले तर आपण चुकीचे काम करू शकत नाहीत. प्रभूचे, गुरूंचे ध्यान करावे इतक्यावर थांबू नये तर त्यांचे जे चांगले गुण आहेत ते गुण स्वतः मध्ये कसे उतरतील याबाबत कृतीशील असायला हवे. साधु, संतांच्या सहवासात आले तर तुमच्याच देखील हे गुण येतील. याबाबत सतत चिंतन करायला हवे. साधु-संतांच्या सहवासात आले तर तुमच्या देखील थोडी का होईना त्यागाची, सद्वर्तनाची भावना येतेच. भारतीय लोक पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करतात, तर पाश्चात्य लोक भारतीय संस्कृतीचे अनुकरण करतात. पाश्चात्यांनी योग, आयुर्वेद यांचा स्वीकार केला व त्यांना त्याचा फायदा होत आहे. कोणतीही गोष्ट आंधळेपणाने करू नये. म्हणतात ना, ‘नकल मे भी अक्कल जरूरी है।’ मेंढ्या ज्याप्रमाणे एकापाठोपाठ आंधळेपणाने, बुद्धिचातुर्य न वापरता पुढच्या मेंढीप्रमाणे चालत असते मग खड्डा असेल तरी त्या त्यात पडतात. अनेकदा आपण देखील मेंढ्यांप्रमाणे वागत असतो. गुणवंतांचे चांगले गुण आत्मसात करावे असे पू. जयपुरंदर मुनी यांनी केले.

आगम प्रवचन श्रुंखलेत पूज्य डॉ. पदमचंद्रमुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांनी श्रावक श्राविकांना प्रवचनाच्या माध्यमातून जीवनात कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन केले. ‘विवेक’ परमो धर्म..  असे आगमकारांनी सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे वाहनांमध्ये एक्सीलेटर असते, त्यासोबतच ब्रेक देखील असतोच. जीवनात विवेक म्हणजे ब्रेक होय. ब्रेकचे उत्तम काम करणारे तंत्र म्हणजे विवेक होय. तो अवलंबला तर पापकर्म बंधातू मानव स्वतःचा बचाव करू शकतो. चालताना पाहून चालावे. पूर्वीचे लोक म्हणायचे, चालताना जमिनीला पाय घासून चालू नये. वधू किंवा वर परीक्षण करताना त्या व्यक्तीची चाल कशी आहे हे त्यावरून ते स्वभाव जाणून घेत असत. उभे कसे राहावे, स्थिर, एकाग्रतेने उभे रहावे. असे सांगण्यात आले आहे. कसे बसावे याबाबत बसताना देखील विवेक उपयोगात आणावा सामायिक करतांना 50 मिनिटे चूळबूळ न करता व्यक्ती बसू शकत नाही.  झोपावे कसे विवेकपूर्ण झोपणे. झोप आराम आपूर्तिसाठी घ्यावी. तसे पाहिले तर मानवी जीवनाचा एक तृतीयांश भाग हा झोपेतच जातो. योगनिद्रा येत असेल तर अर्धा तास झोप देखील पुरीशी होते. भगवान महावीर तर साडे बारा वर्षाच्या काळात फक्त दोन क्षण झोपले होते. बोलणे व जेवण करणे याविषयी आगम मध्ये  सांगितलेले मार्गदर्शन पुढील प्रवचनात सांगण्यात येईल त्यामुळे प्रवचनात खंड पडू देऊ नये असे आवाहन करण्यात आले.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.