रजनीकांतच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
लायका प्रोडक्शनने आजआपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून रजनीकांत यांच्या 170 व्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीम फेम दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल करणार आहेत. लायका प्रॉडक्शनचे चेअरमन सुभास्करन यांच्या वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अनिरुद्ध रविचंदर यांच्या खांद्यावर असणार आहे. सध्या या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 2024 पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
https://twitter.com/LycaProductions/status/1631157410797850625/photo/2

रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटात व्यस्त आहेत. त्यांचा हा १६९ वा चित्रपट आहे.
“सुपरस्टार रजनीकांतसोबतच्या आमच्या पुढील चित्रपटाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाला रसिकांचे भरभरून प्रेम मिळेल याची आम्हाला खात्री आहे” अशा आशयाची पोस्ट लायका प्रोडक्शन करून करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.