इंदौर, लोकशाही न्यूज नेटवर्क
इंदौर (Indore) तेथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत व ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात लढत सुरूर आहे. भारताने पहिल्या डावात १०९ धाव केल्यांनतर कांगारूंचा पहिला डाव 197 धावात संपुष्टात आणला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 88 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती.भारतावर दुसऱ्या डावात ही आघाडी कमी करून कांगारूंना आव्हानात्मक टार्गेट देण्याचा दबाव ठेवला होता. अशा दबावाच्या परिस्थितीत सुद्धा भारताने चांगली खेळी खेळली.

विराट कोहली (Virat Kohli) 12 तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र एका बाजूने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) एकहाती किल्ला लढवत होता. तो ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंचा जोमाने सामना करत होता. पुजाराने भारताचे शतक पार करून दिले. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या श्रेयसने आक्रमक धावा करत त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी भारताला आघाडी मिळवून देण्यास सुरूवात केली. मात्र स्टार्कने त्याची ही 26 धावांची खेळी संपवली.


